दीपक रामदासजी बोडखे

शिव फुले शाहू आंबेडकर तसेच तमाम संत महापुरुषांच्या विचाराने प्रेरित होऊन दीपक दादांनी समाजसेवेचे व्रत घेतले व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गेली २५ वर्षांपासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट मतदारसंघात पूर्वी भारिप तसेच सद्यस्थितीत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून समाजकारण व राजकारण ते करत आहेत.

दीपक रामदासजी बोडखे हे उच्चशिक्षित असून त्यांनी समाजसेवा अनुषंगाने पुरेसा वेळ देता यावा यासाठी आपल्या शिक्षक या नोकरीचा राजीनामा दिला असून आज ते यशोगाथा फाउंडेशन तेल्हारा अंतर्गत स्व.नर्मदाबाई बोडखे अध्यापक महाविद्यालय तेल्हारा,स्व.नर्मदाबाई बोडखे कनिष्ठ महाविद्यालय तेल्हारा,यशोगाथा पब्लिक स्कूल तेल्हारा,पोद्दार जम्बो किड्स तेल्हारा इत्यादी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्षपदी तसेच सचिव – यशोगाथा शिक्षण प्रसारक मंडळ,अकोट या माध्यमातून देखील सामाजिक कार्य करत आहेत त्यासोबत ते यशस्वी व्यावसायिक म्हणून देखील अकोट व तेल्हारा परिसरात सुपरिचित आहेत

विकास कामे

ज्याप्रमाणे १९९९ मध्ये माझे वडील माजी आ.श्री.रामदासजी मनीरामजी बोडखे या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला आपण निवडून दिले आणि आपल्या मतदारसंघात विकासाचे एक नवे पर्व सुरू केले होते त्याचप्रमाणे आपण मला साथ द्याल अशी मला खात्री आहे.

माझ्या वडिलांच्या कार्यकाळात झालेल्या कार्याची माहिती आपणास आहेच आज या मतदारसंघात अनेक प्रकल्प आहेत जे त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कार्याची साक्ष देत आहेत.

सिंचन विभाग
पोपटखेड धरण प्रकल्प या प्रकल्पांतर्गत १७०४ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळत आहे या धरणाचे पाणी आज अकोल्यापर्यंत पोहोचत आहे या धरणामुळे या क्षेत्रामध्ये बारामाही बागायती शेती होऊन शेती उत्पन्नामध्ये आज खऱ्या अर्थाने वाढ झालेली आहे.विशेष बाब या मतदारसंघांमध्ये माझ्या वडिलांनी त्यांच्या कार्यकाळात सिंचनाच्या अनेक योजना मंजूर करून घेतल्या त्यामध्ये शहापूर लघुपाटबंधारे योजना अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या शहापूर गावाजवळ नैसर्गिकरित्या सातपुड्यामधून वाहणारे पाण्याचे स्त्रोत असल्यामुळे व जागा उपलब्ध असल्यामुळे तेथे लघु धरण बांधण्याची अभिनव संकल्पना तत्कालीन आमदार माझे वडील माजी आ.श्री.रामदासजी बोडखे यांनी शासन दरबारी मांडली त्याची फलश्रुती आज हा प्रकल्प मागील वीस वर्षापासून शेकडो हेक्टर शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देत आहे.शहापूर,रामापूर,राहणापूर तसेच आसपासच्या गावात सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देत आहे.

निजामपूर बोर्डी लघु पाटबंधारे योजना – सदर प्रकल्पाची सिंचन क्षमता १६४ हेक्टर असून बोर्डी,निजामपूर,शिवपूर परिसरातील शेतीला सिंचनाची सोय होत आहे.

उमरेश्वरी साठवण तलाव योजना तेल्हारा, करी लघु तलाव योजना, कोल्हापुरी बंधारे योजना
वरील प्रकल्पामुळे मतदारसंघातील १५०० एकर जमीन बागायती क्षेत्रामध्ये आली आणि ५००० हेक्टर शेती क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळाला आहे.

माझे वडील माजी.आ.श्री.रामदासभाऊ बोडखे यांचे स्वप्न आहे की,आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना शेती अनुषंगाने मुबलक पाणी,आवश्यकवीज आणि शेत रस्ते उपलब्ध करून दिल्यास ते कधीही आत्महत्या करणार नाहीत.

वाण धरण प्रकल्प – या प्रकल्पामुळे अकोट,तेल्हारा,संग्रामपूर या तालुक्यातील १९१७७ हेक्टर जमिनीस सिंचनाचा लाभ मिळत आहे.अकोट तेल्हारा व अकोला तालुक्यातील गावांना तसेच अकोट शहराला या धरणाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे.जवळपास हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे.

माझ्या वडिलांच्या कार्यकाळात लघु सिंचन विभागांतर्गत रोजगार हमी योजनेची कार्य मोठ्या प्रमाणात करण्यात आली.जवळपास १०९८ विहिरी,४३० शेततळे,१६ गावांना गावतलाव,आदिवासी कुटुंबाला एक प्रमाणे ९८ विहिरी इ.माजी आ.श्री.रामदासजी बोडखे यांच्या प्रयत्नाने या तालुक्यात झाले आहेत.

वान जलविद्युत प्रकल – वान धरणावर सुरू झालेला हा जलविद्युत प्रकल्प विदर्भातील दुसरा असून १.५ मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प आहे.वान प्रकल्पाच्या विद्युत निर्मितीमुळे अकोट तेल्हारा तालुक्यातील औद्योगीकरणास चालना मिळाली आहे.

पाणीपुरवठा योजना ८४ खेडी प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजना – माजी आ.श्री.रामदासभाऊ बोडखे यांनी निवडून आल्यानंतर सर्वप्रथम ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेचे कामे हाती घेतली आणि आज ती योजना पूर्ण होऊन सर्व गावांना पाण्याचा पुरवठा करीत आहे.

अकोट ग्रामीण रुग्णालय वाढीव बांधकाम ३८ खाटांचे वाढीव रुग्णालयाचे बांधकाम २००१ मध्ये आ.श्री.रामदासभाऊ बोडखे यांनी पूर्ण केले.

“शासकीय क्रीडा प्रशिक्षण केंद्र” क्रीडा संकुल अकोट अकोट आय.टी.आय. ४ एकर जागा क्रीडा संकुलासाठी मंजूर करून घेतली.आज या संकुलात दररोज शहरातील युवक युवती आपला सैनिकी भरती व इतर खेळ सराव करत आहेत.

माजी आ.श्री.रामदासजी बोडखे यांनी पूर्णा खोऱ्यातील खारे पाणी पट्टा या समस्येचे निवारण केले.

माजी आ.श्री.रामदासजी बोडखे यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये जी गावे व आदिवासी लोक विस्थापित झाले होते त्यांच्या पुनर्वसनाचे काम केले.

वाल्मीक आंबेडकर योजना – मतदारसंघातील ज्या लोकांकडे पक्के घरे नाहीत व दलित वस्तीमध्ये राहतात अशा दलित मागासवर्गीय लोकांकरीता स्वतःचे पक्के घर असावे याकरीता सदर योजनेमधून १०२६ घरांचे मंजुरीचे प्रस्ताव शासनास सादर करून त्यापैकी २४९ घरांना या योजने अंतर्गत मंजुरी मिळाली आहे.

सत्र न्यायालय स्थापन करण्यात योगदान – अकोट परिसरातील जनतेची गरज लक्षात घेता वित्त विभागाकडून ३१/०३/२००४ रोजी जिल्हा व सत्र न्यायालयासाठी २४ नवीन पदांची व अतिरिक्त सहकारी अधियोक्ता यांच्या कार्यालयासाठी ०३ नवीन पदे निर्माण करण्याची मान्यता मिळवून घेतली.प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी सतत पाठपुरावा केला.त्या माध्यमातूनच अकोट येथे जिल्हा व सत्र न्यायालयाची निर्मिती

कृषी विभाग – प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये शेततळे असावे याकरिता मतदारसंघामध्ये ४०० शेततळ्याची निर्मिती केली.

पान पिंप्री अनुदान – इतर फळ उत्पादकाप्रमाणे पान पिंप्रि उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा शासकीय अनुदान मिळावे म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांच्याकडे तशी मागणी केली आणि कास्तकरांना प्रत्येकी ०४ हजार रुपये अनुदान शासनाने जाहीर केले.

सार्वजनिक बांधकाम विभाग – माजी आ.श्री.रामदासभाऊ बोडखे यांच्या कार्यकाळात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्याविषयी जनतेला पूर्ण माहिती आहे की,भाऊंनी ०५ वर्षांमध्ये मतदार संघामध्ये सर्व लहान मोठे रस्त्यांचे जाळे विकसित केले, अनेक रस्त्याची पुनर्रचना केली,नवीन रस्त्याची निर्मिती केली,अनेक फुलांचे निर्माण केले अशा एक ना अनेक योजना आपल्या मतदारसंघात राबविलेल्या आहेत.

माजी मा.आमदार श्री.रामदासजी बोडखे यांच्या स्वप्नातील अकोट मतदारसंघ निर्माण करण्याकरीता त्यांना पाच वर्षे कालावधी कमी पडला असून त्यांना अनेक योजना ह्या मतदारसंघात राबवता आल्या नाहीत त्यामधील प्रामुख्याने पुढीलप्रमाणे योजना बाकी आहेत.
१) शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय
२) अकोट व तेल्हारा येथे युवक युवतींकरीता अत्याधुनिक तथा स्वतंत्र भव्य क्रीडा संकुल
३) अकोट सह तेल्हारा येथे नवीन भव्य बाजारपेठ
४) शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय
५) वैद्यकीय महाविद्यालय
६) स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या अकोट तेल्हारा तालुक्यातील विद्यार्थ्यांना अद्ययावत अभ्यासिकांची निर्मिती करणे.

वरील सर्व कामे पूर्ण करण्यासाठी आपण मला यावेळी आपले अमूल्य मत देऊन संधी द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो व माझ्या गॅस सिलेंडर या निशाणी समोरील बटण क्र.५ दाबून मला प्रचंड बहुतानांनी विजयी कराल अशी आपणास विनंती करतो.

दीपक रामदासजी बोडखे यांचे मतदारांना आवाहन

आदरणीय मतदार बांधव भगिनींनो येणाऱ्या २० तारखेला आपण अकोट विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ या अनुषंगाने आपले अमूल्य मत देऊन आपले व मतदारसंघाचे भविष्य ठरवणार आहोत.आपल्या मतदारसंघाचे त्याचप्रमाणे राज्याचे भविष्य ठरवण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे.निवडणूक म्हणजे फक्त मत देण्याचा अधिकार नव्हे तर आपल्याला हवे असलेले बदल घडविण्याची ही संधी आहे माझ्या प्रिय मतदारांनो मी आज या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा मा.श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी या पक्षातर्फे आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने ही निवडणूक लढविण्याकरीता उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे.कारण मला तुमच्या सर्व समस्यांचे गांभीर्य आहे.

सर्वसामान्य नागरिक म्हणून प्रामुख्याने आपल्याला शिक्षण,रोजगार,आरोग्य,रस्ते,पाणी व वीज या उत्तम दर्जाच्या मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी तसेच या मतदारसंघाच्या विकासाच्या प्रक्रियेत माझा सहभाग असेल असा शब्द मी आपल्याला देत आहो.

 आपल्याला कल्पना आहे की,अजूनही आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे माझे वचन आहे की मी निवडून आल्यावर आपल्याला भेडसावत असणाऱ्या सर्व समस्यांवर काम करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीन.माझ्या प्राथमिकता स्पष्ट आहेत की,समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोचविणे,आरोग्य सुविधांचा विकास करणे,तरुण तरुणींना रोजगारांच्या संधी निर्माण करणे आणि त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना रोजगार मिळवून देणे इ.माझे मुख्य उद्दिष्ट आहे.आपल्या भागातील शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी शेतरस्ते,बंधारे बांधणे तसेच शेतकऱ्यांचे जिवनमान उंचावण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार.माझ्या मते आपल्याला असा प्रतिनिधी हवा जो सदैव तुमच्यासाठी उपलब्ध असेल जो तुमच्या प्रत्येक समस्येत तुमच्या सोबत उभा असेल तुमचे प्रश्न हे माझे प्रश्न आहेत तुमच्या समस्यांची सोडवणूक करणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट आहे त्यामुळे मी तुम्हाला आश्वासन देतो की,सदैव तुमच्या सोबत असणार आहे तुमच्या आशिर्वादाने आणि तुमच्या मतांनी मला तुमची सेवा करण्याची संधी मिळेल अशी आशा या माध्यमातून व्यक्त करतो.

आपण या निवडणुकीत एकजुटीने सहभागी होऊन विकासाचा एक नवा अध्याय लिहूया माझा विश्वास आहे की आपल्या एक एक मताने सकारात्मक बदल घडवुन आणल्या जाईल.या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की,आपल्या मताचा योग्य वापर करा आपल्याला हवा असलेल्या बदलासाठी मतदान करा आणि आपल्या मतदारसंघाच्या उज्वल भविष्याचा विचार करून मला साथ द्या.येणाऱ्या २० नोव्हेंबर २०२४ तारखेला माझ्या गॅस सिलेंडर या निशाणी समोरील बटण क्र.५ दाबून मला प्रचंड बहुतानांनी विजयी कराल अशी आपणास विनंती करतो.

जोशाबा समतापत्र

पत्ता: “यशोदा कृपा” रामटेक पुरा, अकोट,
तालुका अकोट, जिल्हा अकोला – ४४४१०१

मोबाईल: 9511874002
ई-मेल: dipakbodkhe74@gmail.com

© 2023 Created with Forte Studioz akola